Saturn Transit 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार आजही अनेकजण राशिभविष्य वाचत असतात. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार एखादे शुभकार्य केले जाते. मात्र काही वेळा शनीचा कार्यकाळ काहींना धोकादायक ठरतो किंवा काहींना शुभ ठरतो.
शनिदेव माणसाला त्यांच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार फळ देतात. तो सध्या मकर राशीत संक्रमण करत आहे. तथापि, 10 दिवसांनंतर, तो दुसऱ्या राशीत संक्रमण करेल. 17 जानेवारी 2023 रोजी शनी मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल.
2025 पर्यंत तो येथे राहणार आहे. यामुळे काही राशींसाठी साडेसाती आणि धैय्या संपतील तर काहींसाठी सुरुवात होईल. मात्र, एक राशी अशी आहे की, ज्यावर सर्वात धोकादायक असल्याचे सांगितले जात असलेल्या साडे सातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामुळे या राशीच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागेल.
कुंभ
कुंभ राशीत शनीचे संक्रमण असल्याने या राशीच्या लोकांसाठी साडे सातीचे दुसरे चरण सुरू होईल. साडेसातीचा दुसरा टप्पा सर्वात धोकादायक मानला जातो. या काळात व्यक्तीला मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो.
एकाग्रतेवर परिणाम
कुंभ राशीबद्दल सांगायचे तर, साडे सातीचा दुसरा टप्पा एकाग्रतेवर वाईट परिणाम करू शकतो. परीक्षा-मुलाखतीची तयारी करणारे लोक लक्ष्यापासून दूर जाऊ शकतात. वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
जोडीदारासोबत मतभेद वाढू शकतात, याचा नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जे अविवाहित आहेत, त्यांना लग्नासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. यामुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात.
वाईट परिस्थिती
मात्र, कुंभ राशीचा स्वामी शनि आहे, त्यामुळे हा काळ त्याच्यासाठी तितकासा त्रासदायक नसेल, परंतु काही बाबतीत त्याला लाभही मिळेल. साडेसाती किंवा धैयाच्या काळात ते अशा लोकांना जास्तीत जास्त त्रास देतात, ज्यांच्या कुंडलीत त्यांची स्थिती अशुभ असते.