बचतच बचतः काहीही पैसे न देता खरेदी करा होंडा अ‍ॅक्टिवा 125 ; कसे ते जाणून घ्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-जर तुम्ही होंडाची दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लवकरच खरेदी करा. सध्या कंपनी होंडा अ‍ॅक्टिव्हावर उत्तम ऑफर देत आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या नवीन ऑफर व सवलत आणत आहेत.

ऑटो कंपन्या ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन ऑफर लागू करतात. सध्या कंपनी काहीही पैसे न देता होंडा अ‍ॅक्टिवा 125 खरेदी करण्याची ऑफर देत आहे. तर आपण देखील होंडा अ‍ॅक्टिव्हा खरेदी करण्याची योजना आखत असाल तर आपण या ऑफरचा फायदा घेऊ शकता.

एक्टिवा 125 वर 100% कर्जाची ऑफर :- कंपनी जीरो डाऊन पेमेंट, शून्य डॉक्युमेंटेशन फी, शून्य मुद्रांक शुल्क, शून्य हायपोथिकेशन फी, कोणत्याही चेक शिवाय ही ऑफर देत आहे. वास्तविक, कंपनी अ‍ॅक्टिवा 125 वर 100 टक्के कर्ज देत आहे. म्हणजेच आपण पैसे न देता होंडा अ‍ॅक्टिवा 125 घरी घेऊन जाऊ शकता.

यासह कंपनी ग्राहकांना एलटीसीचा लाभही देत आहे. ही होंडाची शून्य टेंशन ऑफर आहे जी निवडक डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर उपलब्ध आहे. 8875038884 या व्हॉट्स अॅप नंबरवर आपण ‘हाय’ असा मॅसेज करून अधिक माहिती मिळवू शकता.

स्प्लेंडरवर 16500 रुपये फायदा मिळवा :- इतकेच नाही तर याशिवाय तुम्ही हिरोची बाईक स्प्लेंडर घेतल्यास तुम्हाला बम्पर सूट मिळू शकते. सुपर स्प्लेंडरनेही मोटारसायकलींवर भारी सूट जाहीर केली आहे. हीरो सुपर स्प्लेंडरवर 16500 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. 12000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक,

2000 रुपयांचे एक्सचेंज / लॉयल्टी बोनस आणि सरकारी कर्मचार्‍यांना 2500 रुपयांपर्यंतची सूटही दिली जात आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नजीकच्या शोरूममध्ये जावं लागेल. हीरो सुपर स्प्लेंडर एक्स शोरूम किक कास्ट व्हेरिएंटची किंमत, 84,011 पासून सुरू होते.

12,999 रुपयांच्या डाउनपेमेंटवर हिरो ग्लॅमर खरेदी करा :- जर तुम्ही आता हिरो ग्लॅमर मोटरसायकल खरेदी केली तर तुम्हाला चांगली ऑफर मिळेल. ग्लॅमरवर कंपनीने प्रचंड सूट जाहीर केली आहे. आपण केवळ 12,999 रुपयांच्या डाउनपेमेन्टद्वारे आपण हिरो ग्लॅमरला घरी घेऊन जाऊ शकता.

कंपनीच्या ऑफरमध्ये 12000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक, 2000 रुपयांचे एक्सचेंज / लॉयल्टी बोनस आणि सरकारी कर्मचार्‍यांना 2500 रुपयांपर्यंतची सूटदेखील देण्यात येत आहे. हीरो ग्लॅमर एक्स शोरूम किक कास्ट व्हेरिएंटची किंमत 59,550 रुपयांपासून सुरू होते. अधिक माहितीसाठी आपण जवळच्या शोरूमला भेट देऊ शकता.

 भारतातील जास्त मायलेज देणाऱ्या टॉप-10 बाइक :-

  • – बजाज CT110 ,माइलेज 104 kmpl , किंमत 48,704 रु.
  • – टीवीएस स्टार सिटी , माइलेज 85 kmpl , किंमत 62,784 रु.
  • – बजाज प्लेटिना 110 H गियर, 84 kmpl माइलेज, किंमत 62,899 रु.
  • – हीरो सुपर स्प्लेंडर, 83 kmpl माइलेज, किंमत 71,650 रु.
  • – हीरो स्प्लेंडर प्लस, 80 kmpl माइलेज , किंमत 60,310 रु.
  • – होंडा CD110 ड्रिम, माइलेज 74 kmpl , किंमत 65,505 रु.
  • – टीवीएस रेडिऑन, 69 kmpl माइलेज, किंमत 59,742 रु.
  • – होंडा शाइन 65 kmpl माइलेज , किंमत 68,812 रु.
  • – हीरो स्प्लेंडर iSmart , 61 kmpl माइलेज, किंमत 65,672 रु.
  • – हीरो पॅशन प्रो 110 , 60 kmpl माइलेज, किंमत 65,750 रु.
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24