अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- पोलिस असल्याचे सांगून वृद्धास तब्बल ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याचा अंगठ्या लंपास केल्याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीगोंदे शहरातील स्वरस्वती नदीच्या पुलाजवळील खंडोबा मंदिर परिसरात गोविंद शिधू भोयटे, रा. शिदनकर गल्ली हे आराम करत होते.
त्या ठिकाणी दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती येऊन त्यांनी भोयटे यांना सांगितले की, आम्ही पोलिस असून तुमच्या गावात रात्री चोरी झाली.
तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या हातात घालू नका. त्या काढून तुम्ही तुमच्या रुमालात ठेवा, असे सांगितले. यावरून भोयटे यांनी त्यांच्या खिशातून रुमाल काढत ४५ हजारांच्या अर्धा तोळा सोन्याच्या अंगठ्या रुमालात बांधून दिल्या.
मात्र, काही वेळानी रुमाल उघडून पाहिले असता त्यात त्यांना सोन्याच्या अंगठ्या आढळून आल्या नाहीत.या गुन्ह्या बाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल रोहिदास झुंजार करत आहेत.