SBI ATM Franchise : मस्तच.. SBI देत आहे घरबसल्या दरमहा 70,000 रुपये कमावण्याची सुवर्णसंधी! त्यासाठी तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम

Pragati
Published:

SBI ATM Franchise : जर तुम्हाला घर बसल्या व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला एक सुवर्णसंधी देत आहे. त्यामुळे घरी बसून प्रत्येक महिन्याला 70,000 रुपये कमावता येतील.

SBI ATM फ्रँचायझीमार्फत ही कमाई करू शकता. परंतु फ्रँचायझी घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. जर तुम्ही त्या पूर्ण केल्या तर तुम्हाला SBI ATM फ्रँचायझी मिळेल आणि तुम्ही बंपर कमाई करू शकता. कसे ते जाणून घ्या.

SBI च्या ATM फ्रँचायझीमध्ये तुम्ही अवघ्या 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून त्याचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला वर्षानुवर्षे प्रत्येक महिन्याला 60 ते 70 हजार रुपये कमवता येतील. समजा तुम्हाला एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज करायचा असल्यास त्यासाठी बँकेकडून काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत, ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे.

जाणून घ्या अटी

समजा तुम्ही SBI ATM फ्रँचायझी घेण्याच्या विचारात असल्यास यासाठी बँकेकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांचे पालन तुम्ही करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्याकडे 50 ते 80 चौरस फूट जमीन असणे गरजेचे आहे.

तसेच हे लक्षात ठेवा की दुसऱ्या एटीएमचे अंतर 100 मीटर असावे. इतकेच नाही तर तुम्ही जे एटीएम बसवत आहात ते लोकांना दिसावे. एटीएमच्या ठिकाणी 24 तास विजेची सुविधा असणे गरजेचे आहे. एटीएममध्ये काँक्रीटचे छत पाहिजे आणि प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्रही पाहिजे.

लागणारी कागदपत्रे

बँकेच्या एटीएम फ्रँचायझीसाठी, तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असावीत, ज्यात पत्ता पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड इ. तसेच पासबुक आणि बँक खाते यांसारखी महत्त्वाची कागदपत्रेही तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला SBI ATM फ्रँचायझीसाठी अर्ज करता येईल.

असा करा अर्ज

बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार, ATM बसवण्याचे कंत्राट टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम सारख्या कंपन्यांना दिले आहे. त्यामुळे तुम्हाला या कंपन्यांशी संपर्क साधावा लागणार आहे. किंवा तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटच्या इतर पर्यायावरून अर्ज करता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe