SBI FD Scheme : जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत खाते असेल आणि तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण या बँकेने एफडीच्या व्याजदरात कमालीची वाढ केली आहे.
आपल्या ग्राहकांसाठी बँकेकडून ‘अमृत कलश’ या योजनेला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या या बँकेच्या 400 दिवसांच्या मुदत ठेवीवर जबरदस्त व्याज दिले जात आहे. कसे ते जाणून घ्या सविस्तर.
एसबीआयच्या ग्राहकांना आता 400 दिवसांच्या कालावधीत, व्याज दर 7.29 टक्के प्रभावी व्याजदर मिळणार आहे, समजा ग्राहकांनी हे व्याज काढले नाही तर तिमाहीत चक्रवाढ करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक उत्पन्न 7.82 टक्के असणार आहे.
ही मुदत ठेव सर्वात अगोदर FY22-23 मध्ये 15 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत सुरू केली होती. आता, या बँकेकडून 12 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 पर्यंत ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
जाणून घ्या संपूर्ण योजना
सध्या, या बँकेकडून दोन वर्षापासून ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींसाठी कमाल 7 टक्के व्याजदर देण्यात येत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात जास्त व्याज दर त्याच कालावधीसाठी तसेच दीर्घ कालावधीसाठी 7.5 टक्के दिले जात आहे. बँकेची ही 5-10 वर्षांच्या ठेव कालावधीसह ‘SBI Wecare’ मुदत ठेव योजनेअंतर्गत आहे.
तर, अमृत कलश अंतर्गत व्याज मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर देय असणार आहे. तर मॅच्युरिटीवरच सर्व मिळून व्याज मिळेल. आयकर कायदा, 1961 अंतर्गत ठेवीदाराला लागू असणाऱ्या कर स्लॅब दरावर TDS कापण्यात येणार आहे. तर मुदत संपल्यावर बँक TDS चे व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा करते.
प्रत्येक महिन्याला मिळणार इतके व्याज
अमृत कलश योजनेतील गुंतवणूकदारांना आता मासिक, त्रैमासिक आणि सहामाही आधारावर व्याज घेता येते. या विशेष एफडी ठेवीवरील मुदतपूर्तीचे व्याज टीडीएस कापल्यानंतर ग्राहकाच्या खात्यात जमा करण्यात येईल. आयकर कायद्यांतर्गत लागू होणाऱ्या दराने टीडीएस आकारण्यात येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमृत कलश योजनेत मुदतपूर्व आणि कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.