SBI New Rule: स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता ‘या’करिता द्यावे लागतील जास्त पैसे! स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर हे वाचाच….

Published by
Ajay Patil

SBI New Rule:- 31 मार्च पासून आर्थिक वर्ष संपेल व एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार असल्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून अनेक नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत व बँकांच्या माध्यमातून देखील एक एप्रिल पासून नवीन नियम लागू होणार आहेत.

त्यामुळे या नवीन लागू होणाऱ्या नियमांचा नक्कीच परिणाम हा त्या त्या बँकांच्या ग्राहकांवर होणार आहे. यातील काही नियम हे ग्राहकांच्या फायद्याचे तर काही नियम हे ग्राहकांच्या खिशाला झटका देणारे ठरणार आहेत.

अगदी याच पद्धतीने जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचा विचार केला तर ही बँक देशातील सर्वात मोठी बँक असून त्याच्यामध्ये या बँकेचे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहे. परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया आता एक एप्रिल पासून डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डच्या बाबतीत काही नवीन नियम लागू करणार आहे व याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

एक एप्रिल पासून स्टेट बँक ऑफ इंडियाने विविध डेबिट कार्ड करिता असलेल्या सर्विस चार्जेसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे व हा बदललेला नियम पुढील आठवड्यापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 स्टेट बँक 1 एप्रिल पासून वाढवणार डेबिट कार्डवरील सर्विस चार्जेस

याबाबत एसबीआय ने माहिती दिली असेल त्या माहितीनुसार बँकेने विविध डेबिट कार्डच्या वार्षिक सर्विस चार्जेसमध्ये 75 रुपये पर्यंत वाढ केलेली आहे व हे नवीन चार्जेस एक एप्रिल 2024 पासून लागू होणार आहेत. स्टेट बँकेच्या ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस, सिल्वर, क्लासिक इत्यादी डेबिट कार्डच्या बाबतीत ग्राहकांना आता दोनशे रुपये अधिक जीएसटी भरावा लागणार आहे.

याआधी तो 125 रुपये भरावा लागत होता. म्हणजे यामध्ये 75 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त बँकेचे कॉम्बो डेबिट कार्ड, माय कार्ड तसेच युवा व गोल्ड कार्ड यामध्ये सर्विस चार्ज 175 रुपयांऐवजी आता 250 रुपये आकारला जाणार. तसेच एसबीआय प्लॅटिनम डेबिट कार्डवर आता 250 ऐवजी 325 रुपये आकारले जाणार आहेत.

तसेच प्राइड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड वर वार्षिक देखभाल शुल्क सध्या साडेतीनशे रुपये आहे. परंतु त्यामध्ये आता वाढ करण्यात येऊन त्यानुसार आता ग्राहकांना 425 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे या सर्व वाढलेल्या शुल्कांवर स्वतंत्र जीएसटी लागू आहे.

 एसबीआय क्रेडीट कार्डच्या बाबतीत देखील होणार हे बदल

स्टेट बँकेच्या माध्यमातून डेबिट कार्डच्या बाबतीतच नाही तर क्रेडिट कार्डच्या बाबतीत देखील काही बदल केले जाणार आहेत. यामध्ये काही क्रेडिट कार्डच्या बाबतीत रिवार्ड पॉईंटशी संबंधित बदल असणार आहेत

व ते एक एप्रिल पासून लागू केले जाणार आहे. या बदलानुसार आता काही विशेष क्रेडिट कार्डधारकांना यापुढे क्रेडिट कार्डद्वारे जर पेमेंट केले तर मिळणाऱ्या रिवार्ड पॉईंटचा लाभ मिळणार नाही.

Ajay Patil