Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

SBI Scam Alert : सावधान! तुम्हालाही आला असेल तर असा मेसेज तर चुकूनही करू नका ‘या’ लिंकवर क्लिक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SBI Scam Alert : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बॅँक आहे. जर तुम्हीही या बँकेचे म्हणजेच एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण काही ग्राहकांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर सध्या एक मेसेज येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यात ग्राहकांचे खातं ब्लॉक करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. समजा तुम्हाला असा मेसेज आला असल्यास वेळीच सावध व्हा. कारण हा स्कॅमर्सद्वारे पाठवण्यात येणारा हा बनावट मेसेज आहे. याची लगेच माहिती बँकेला द्या.

हे लक्षात ठेवा की पीआयबी फॅक्ट चेक या अधिकृत सरकारी संस्थेकडून ग्राहकांना या ‘फेक मेसेज’ला बळी पडू नका, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत पीआयबीने असे ट्विट केले आहे की, ‘बँकेची तोतयागिरी करणारा एक बनावट संदेश दावा करत आहे की संशयास्पद क्रियाकलापांमुळे प्राप्तकर्त्याचे खाते तात्पुरते लॉक करण्यात आलेआहे.

त्यामुळे अशा तुमचा बँकिंग तपशील शेअर करण्यासाठी विचारणाऱ्या ईमेल/एसएमएसला चुकूनही प्रतिसाद देऊ नका. जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर अशा मेसेजची लगेच [email protected] वर तक्रार करा.

हॅक होईल तुमचे खाते

हॅकर्सना आता तुमची वैयक्तिक माहिती ऍक्सेस करण्यासाठी लिंकमधील काही मालवेअर वापरता येतील. तुमचा वैयक्तिक डेटा लीक होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे जर तुम्ही अशा लिंकवर क्लिक केले तर, स्कॅमरना तुमच्या खात्यात प्रवेश मिळेल

असे राहा सुरक्षित

स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर बँकांकडून असे सतत सांगण्यात येत आहे की त्यांचे कोणतेही अधिकारी वैयक्तिक, बँकिंग तपशील किंवा OTP सामायिक करण्यासाठी ई-मेल किंवा एसएमएस करत नाहीत. त्यामुळे जर असा मेसेज तुमच्या फोनवर आला असेल तर तुम्ही तात्काळ संबंधित बँकेशी संपर्क करावा. तुम्हाला अशा संदेशांची तक्रार [email protected]वर करता येते.