Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Scams Alert : वापरकर्त्यांनो सावधान! तुमची ईमेलवरील एक चूक अन् मिनिटात होईल बँक खाते रिकामे, कसे ते जाणून घ्या

Scams Alert : प्रत्येकजण Gmail वापरत असतो. वापरकर्त्यांना अनेक प्रकारची नोटिफिकेशन्स या ठिकाणी येत असतात. मात्र सध्या याच Gmail मुळे वापरकर्त्यांना खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. याचे कारणही अगदी तसेच आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फसणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. फसवणूक करणारे ग्राहकांना टार्गेट करून Gmail च्या लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत. त्यामुळे तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे. तुम्ही तुमची फसवणूक टाळू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.

या ईमेलपासून राहा सावध

1. स्पॅम ईमेल: जीमेल खात्यामध्ये एक फोल्डर स्पॅम असून ज्यात अनेक असे ईमेल येत आहेत ज्यांचे कोणतेही काम नसते किंवा असे ईमेल बनावट असण्याची शक्यता खूप असते. जेव्हा तुम्ही हे फोल्डर तपासत असाल तेव्हा हे लक्षात ठेवा की जर काही बनावट ईमेल असतील तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका ते लगेच डिलीट करा.

2. लोन ईमेल: अनेकदा असे ईमेल येत असतात, ज्यात लोक कोणत्याही अटीशिवाय कर्ज मिळेल असे सांगतात. अशा लिंकवर क्लिक करताच तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. त्यामुळे अशा ईमेल्स व्यवस्थित तपासून घ्यावे.

3. फसवणूक ईमेल: इतकेच नाही तर तुम्ही अनेक आकर्षक ऑफर असणाऱ्या किंवा तुम्हाला भुरळ घालणारी कोणतीही माहिती असणाऱ्या ईमेलवर क्लिक करू नका. तसेच असे ईमेल ताबडतोब डिलीट करा, कारण या ईमेलद्वारे तुम्हाला व्हायरस पाठवला जाण्याची शक्यता खूप दाट असते.