कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षा स्थगित करावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शिक्षक भारतीने शासनाला पत्र देऊन विनंती केली आहे.

मात्र शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. परीक्षा पुढे ढकलली नाही तर शिक्षक भारती परीक्षेवर बहिष्कार टाकेल, असा इशारा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिला.

देशपातळीवरील प्रमुख परीक्षा पुढे ढकलेल्या असतानाही, तसेच विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होत असताना लहान मुलांच्या परीक्षा मात्र आॅफलाइन पद्धतीनेच घेण्याचा हट्ट का?, असे शिक्षक भारती संघटनेने विचारले आहे.

केंद्र शासनाच्या सूचनांकडे, शिक्षक संघटना ,पालक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यभरात एकूण ६ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. एका परीक्षा केंद्रावर अनेक परिक्षार्थी असतात.

तेवढ्याच प्रमाणात पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करावी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफलाइन परीक्षा कोविडच्या काळात घेणे, आवश्यक आहे का? काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने कोणत्याही परीक्षा या काळात घेण्यात येऊ नये,

असे निर्देश दिलेले असतानाही परीक्षा परिषदेने परीक्षा होणार असल्याचे नियोजन पत्र काढणे, म्हणजे हा खोडसाळपणा आहे. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात लहान मुलांची परीक्षा घेणे धोक्याचे आहे.

त्यामुळे ही परीक्षा स्थगित करावी, अन्यथा परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, मोहमंद समी शेख, योगेश हराळे, जितेंद्र आरु,

विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, महेश पाडेकर, किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, संभाजी चौधरी,

नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, गोरखनाथ गव्हाणे, सोपानराव कळमकर, आशा मगर, विभावरी रोकडे मिनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर आदींनी दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24