शाळा या आॅलंम्पियन बनविण्याचे केंद्र व्हावे – आमदार सुधीर तांबे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-शारीरिक शिक्षण हे सुदृढ समाजाच्या विकासाचे माध्यम, तर शिक्षक हा शाळेचा आत्मा आहे.

शारीरिक शिक्षक संचमान्यतेत यावा म्हणून सभागृहात व शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करून आगामी संचमान्यतेत शिक्षकाला घेतले असून ग्रेसगुणांबाबत सकारात्मक निर्णय होईल.कोरोना परिस्थिती सुधारल्यानंतर नोकर भरती संदर्भात पाठपुरावा करू.

क्रीडा साठी शासनाने गायरान जमिनी, शिक्षक व निधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षणमंत्री सकारात्मक असल्याचे व आगामी काळात शाळा हे ऑलंम्पीअन घडविण्याचे केंद्र व्हावे असे मत पदवीधर आमदार डाॅ. सुधीरजी तांबे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील नावीन्याच्या ध्यास घेतलेल्या क्रीडा क्षेत्रातील क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून ” महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघ अहमदनगर या संघटनेच्या ”वाटचाल’-आधूनिक शारीरिक शिक्षणाची” या डिजिटल नियतकालीचा आॅनलाईन प्रकाशन सोहळया प्रसंगी आमदार डाॅ. सुधीरजी तांबे बोलत होते.

दरम्यान या आॅनलाईन सोहळ्यास उपस्थित सर्व आमदार महोदयांच्या शुभहस्ते लिंक ओपन करून ऑनलाईन पद्धतीने प्रकाशन सोहळा संपन्न झाला. खेळामुळे समाजातील प्रत्येक घटक जोडला जातो.

सुदृढ देश व समाज घडविण्यासाठी शारीरिक शिक्षण विषयाला विशेष महत्त्व प्राप्त होणे गरजेचे आहे.नवीन संच मान्यतेत शारीरिक शिक्षण शिक्षक पदाची पुर्नस्थापना होणार असून येत्या नवीन संचमान्यतेत कला व शारीरिक शिक्षण शिक्षक हे पद निश्चितच कायम राहणार असल्याची माहिती शिक्षक आम.कपिल पाटील यांनी दिली.

शारीरिक शिक्षणावर यापूर्वी शासनाकडून मोठा अन्याय झाला आहे. महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षकांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची प्रत्येक समस्या शासन दरबारी मांडण्याचेही आश्वासन अमरावती विभागाचे आमदार डाॅ .किरण सरनाईक यांनी दिले.

पवित्र पोर्टलवर बीपीएड पद आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन आम.जयंत आसगावकर यांनी देत’ वाटचाल नियतकालिक राज्यातील क्रीडा शिक्षक व विद्यार्थ्यांना दीपस्तंभासारखे निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा आशावाद व्यक्त केला.

नागपूर विभागाचे आमदार अभिजीत वंजारी यांनीही नियतकालीकास शुभेच्छा दिल्या. शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर , शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, शिवदत्त ढवळे,

उपाध्यक्ष आनंद पवार, घनश्याम सानप, संपादक राजेश जाधव ,कार्यकारी संपादक सुवर्णा देवळाणकर, राजेंद्र पवार, दत्तात्रय मारकड, डॉ मयुर ठाकरे, डाॅ.जितेंद्र लिंबकर, महेंद्र हिंगे, दिनेश म्हाडगूत, तायाप्पा शेंडगे, दत्तात्रय हेगडकर, शेखर शहा यांनी मनोगत व्यक्त केली.

शासनाने तात्काळ नोकर भरती सुरू करावी:-राजेंद्र कोतकर राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त ५-७ शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या जागा भरल्या आहेत.

शासनाने तात्काळ पुन्हा शारीरिक शिक्षण शिक्षक नोकर भरती सुरू करावी अन्यथा सर्व संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असेही शासनाला त्यांनी याप्रसंगी सुचित केले ग्रेस गुण, संचमान्यता, वरीष्ठ व निवडश्रेणी प्रश्ना बाबत लक्ष घालण्याची विनंती त्यांनी आमदार महोदयांना केली.

या प्रकाशन सोहळ्यासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुल कोकमठाण व स्पेस इन्फोटेकचे प्रशांत खिलारी यांनी तांत्रिक सहकार्य पुरविले. महासंघाचे उपाध्यक्ष आनंद पवार यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले .

तर आभार प्रितम टेकाडे यांनी मानले . तंत्रस्नेही म्हणून गणेश म्हस्के, राहुल काळे यांनी काम केले . या सोहळ्यास जिल्हा अध्यक्ष सुनील गागरे, उपाध्यक्ष अजित वडवकर, सचिव शिरीष टेकाडे,

खजिनदार नंदकुमार शितोळे, प्रशांत होन, दिनेश भालेराव, सुनील मंडलिक, सोपान लांडे, प्रताप बांडे, संदिप घावटे,ज्ञानेश्वर भोत, निवृत्ती शेलार, विनोद तारू, बाळासाहेब कांडेकर सह राज्यभरातील शिक्षक उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24