अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-आदर्श गाव हिवरे बाजार ता.जि.अहमदनगर येथे कोविड -१९ च्या कोविशील्ड लसीकरणाचा दुसरा टप्पा दिनांक २० मे २०२१ रोजी यशस्वीरित्या पार पडला.
यात एकूण ७० व्यक्तीना कोविशील्ड चे लसीकरण करण्यात आले. प्रामुख्याने हिवरे बाजार येथील कोरोनाच्या विविध पथकात काम करण्याऱ्या स्वयसेवकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले.
त्यात विशेष म्हणजे कुटुंब सर्वेक्षण पथकातील स्वयंसेवक,रुग्णांना विविध तपासणीसाठी हॉस्पिटल पर्यत नेणारे व परत घरी पोहच करणारे वाहनचालक , विलगीकरण कक्षात काम करणारे स्वयसेवक,प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक ,
कुटुंबप्रमुख(विविध कामानिमित्त बाहेर पडणारे),दुध घेऊन नगरला जाणारे शेतकरी तसेच वय वर्षे ४५ पेक्षा जास्त असणारे ज्येष्ठ नागरिक ज्यांना जुनाट आजार आहेत त्यांना लसीकरण करण्यात आले.लसीकरण केलेल्या व्यक्तीव्यतिरिक्त प्रत्यक्ष नोंद्णीसाठी ११० व्यक्ती जास्त आल्या होत्या.
त्याची नावे नोंदणी करून त्यांना पुढील लसीकरणाच्या वेळेस प्राधान्याने लसीकरण करण्यात येईल.त्यासाठी चार पथके तयार केली होती लसीकरणासाठी गावातील स्वयंसेवक व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होता.
त्यात पथक क्र.१ चे कार्ये -आलेल्या व्यक्तीचे ANTIGEN TEST करणे पथक क्र.२ चे कार्ये कोरोना तपासणी केलेल्या व्यक्तीचे रजिस्ट्रेशन करणे तिसऱ्या पथकाचे कार्ये रजिस्ट्रेशन झालेल्या व्यक्तीना लसीकरण करणे चौथ्या पथकाचे कार्ये ज्यांना आज लस उपलब्ध झाली नाही त्यांचे नावे नोंदवून घेणे व पुढील लसीकरणाच्या वेळेस त्यांचा प्राधान्याने समावेश करणे.
हिवरे बाजार येथील एकूण २०५ व्यक्तीची ANTIGEN TEST (कोरोना तपासणी) केली असून त्यात एकही व्यक्ती कोरोना POSITIVE आढळून आली नाही हेच खरे गेल्या महिनाभर हिवरे बाजारामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपयायोजनाचे फलित आहे असे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.
तसेच विविध पथकात काम करणाऱ्या स्वयसेवकाना लसीकरण करण्यात आल्यामुळे ते आता सुरक्षित झाले असून पुढील काम करण्यासठी त्यांचा उत्साह वाढला आहे.
यात कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीना लसीकरण करण्यात आले नाही तसेच दुसऱ्या डोससाठी शासकीय नियमानुसार ८४ दिवस पूर्ण झालेले नसल्यामुळे त्यांना वगळण्यात आले.
कुटुंब व गावातील स्वयसेवकांचे पथक यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरण केले.लस मर्यादित असल्यामुळे एका कुटुंबातील जर ४ व्यक्ती एकाच वेळेस आल्या तर त्याच कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना (ज्याना खरच आवश्यकता आहे) प्राधान्याने लसीकरण करण्यात आले जे गावात राहतात त्यांना प्राधान्य देण्यात आले.
त्यामुळे लसीकरण करताना कुठलीही अडचण आली नाही.लसीकरणाच्या पुढच्या टप्यात खरीपाची तयारी करणारे जे शेतकरी खते व बियाणे खरेदीसाठी बाजारात जाणार आहेत यांचा समावेश असणार आहे.