भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान, 24 तासात रेकॉर्डब्रेक रुग्ण वाढ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-आरोग्य मंत्रालयालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 1501 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर, 2 लाख 61 हजार 500 नवीन रुग्ण समोर आले आहेत.

दरम्यान, 1 लाख 38 हजार 423 रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त तडाखा महाराष्ट्राला बसला आहे.

राज्यात काही दिवसांपासून 60 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज माहिती दिली की,

केंद्राकडून महाराष्ट्राला 1121, उत्तर प्रदेश 1700, झारखंड 1500, गुजरात 1600, मध्य प्रदेश 151 व्हेंटिलेटर देण्यात येत आहेत.

राज्यात 24 तासांत 67 हजार 123 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 419 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 56 हजार 783 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24