अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-‘’लोकांचा बिनधास्तपणा आणि बेफिकिरी प्रचंड वाढतेय. करोनाची दुसरी लाट आली तर आपल्याला सावरायलाही वेळ मिळणार नाही,’’
असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) साथरोग व संसर्गजन्य विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिला आहे.
याला अनुसरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याचे काही आकडे सांगून दक्षतेचा इशारा दिला आहे.
- – एप्रिल महिन्याच्या सुरवातीला त्याचा सर्वोच्च बिंदू असेल. पुढचे शंभर दिवस चिंता वाढविणारे
- – डॉ. गंगाखेडकर यांच्या गणितानुसार एप्रिलमध्ये नगरला ६,३७० रुग्ण उपचाराधीन असू शकतील
- – यातील सुमारे १५ टक्के रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज पडू शकते, ते कमी पडू शकतात.
- – जिल्ह्यात बेडची उपलब्धता २,२६६ आहे
- – जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख, ६८ हजार जणांच्या चाचण्या झाल्या
- – त्यातील ९० हजारावर रुग्ण पॉझिटीव्ह आढळले
- – सध्या ५,२४२ जणांवर उपचार सुरू आहेत.
- – आतापर्यंत १९९५ जणांचा मृत्यू झाला आहे.
- – रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९२ टक्के आहे
- – गेल्या दहा दिवसांत नवे ८ हजार, २६५ रुग्ण आढळून आले
- – आतापर्यंत १ लाख ६५ हजार जाणांचे लसीकरण झाले आहे
- – जिल्ह्याची लोकसंख्या : ४५ लाख, ४३ हजार (२०११ नुसार)