कारवाईपूर्वीच आला गुप्त फोन…मी कारवाईला येतोय, वाहने काढून घ्या, अन्यथा….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :-लाचखोरी असो व कथित ऑडिओ क्लिप पोलीस डाळ नेहमीच वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत येऊ लागले आहे. अवैध धंद्यांना पाठीशी घालणे कारवाया न करणे यामुळे पोलीस दलालाची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. नुकतेच नेवासा तालुक्यातील एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे.

नेवासा पोलीस ठाण्यातून मी कारवाईला येतोय, जेवढी वाहने काढून निघून जाता येईल तेवढी घेऊन जा. मी जोपर्यंत सांगत नाही तापर्यंत सर्व बंद, अशा आशयाची एक पोलीस अधिकारी व अवैध व्यावसायिक यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप गुरुवारी नेवासा तालुक्यात व्हायरल झाली.

‘त्या’ क्लिपमध्ये एक पोलीस अधिकारी समोरच्या व्यक्तीला ‘तुम्ही पिंपळगावमध्ये उच्छाद मांडला असल्याने सगळ्यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करा. मी पोलीस स्टेशनमधून पिंपळगाव येथे येण्यासाठी निघालो आहे. मी तिथे येण्याआधी जेवढी वाहने काढून घेऊन जाता येतील तेवढी काढून घ्या, नाही तर जेवढी वाहने मिळतील तेवढी जप्त करण्यात येतील.

येथून पुढे माझा आदेश येईपर्यंत तुमचे काम बंद राहील’, अशा आशयाच्या संभाषणाची क्लिप नेवासा तालुक्याती फेसबुक, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत आहे.

ही क्लिप कोणी व्हायरल केली? ही वाहने कसली होती? समोरील बोलणारी व्यक्ती कोण? आणि हा पोलीस अधिकारी नेमका कोण? याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विजय करे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीचे संजय सुखधान यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24