अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील वाळुंज येथील महादेव दगडू फुंदे हे सोमवार (दि. २२) रोजी कर्तव्यावरून घरी येत असताना कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनमधून
खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाले जखमी फुंदे यांच्यावर आयुष हॉस्पिटल, राधानगर, खडकपाडा, कल्याण येथे उपचार सुरू आहेत.
फुंदे हे महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स अर्थात सुरक्षा दलात (एमएसएफ) मुंबई येथे कार्यरत आहेत. दि. २२ रोजी ते घरी येत असताना कल्याण रेल्वे स्टेशनजवळ गर्दीमुळे चालू ट्रेनमधून खाली पडले.
जखमी फुंदे यांच्यावर आयुष हॉस्पिटल, राधानगर, खडकपाडा, कल्याण येथे उपचार सुरू आहेत. फुंदे यांच्या मेंदूवर दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या असून, यासाठी पाच लाख रुपये खर्च झाला आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आणखी आठ ते दहा लाख रुपये खर्च येऊ शकतो. फुंदे यांच्या कुटुंबात ते एकमेव कमावते असून, त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची ज़बाबदारी आहे.