‘त्याला’ पाहताच पोलिसांची देखील उडाली धांदल..! ‘या’ तालुक्यात मध्यरात्री रंगला थरार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- पोलिसांचे फक्त नाव घेतले तरी अनेकांची बोबडी वळते. प्रत्यक्ष पहिल्यानंतर पळता भुई थोडी होते. परंतु येथे तर पोलिसांनीच धूम ठोकली आहे.

त्याचे झाले असे, संगमनेर तालुक्यातील कुरण येथे रात्री बिबट्या आल्याची माहिती समजतात बंदोबस्तास असलेले पोलीस कर्मचारी खरोखरच बिबट्या आला का हे पाहण्यासाठी गेले. मात्र त्यांना रस्त्याच्या कडेलाच त्यांना बिबट्या दिसल्याने त्यांची चांगलीच धांदल उडाली.

कुरण येथे मध्यरात्री एक वाजता हा प्रकार घडला. तालुक्यातील कुरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, काल रात्री बारा वाजेच्या सुमारास काही ग्रामस्थांनी या बिबट्याला पाहिले.

त्यांनी याबाबत उरण येथे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना माहिती दिली. त्यांनी रात्री एक वाजता कुरण गाठले. त्यांना रस्त्याच्या कडेलाच उभा असलेला हा बिबट्या दिसला. बिबट्या पाहताच या पोलिसांचीह धांदल उडाली.

नंतर या बिबट्याने जवळच असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या गाईला उचलून नेले. या गाईचा त्याने फडशा पाडला.

अहमदनगर लाईव्ह 24