अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- बेलापूर येथील प्रवरा नदीवरील नावघाट ते बेलापूर बाजारपेठ असा पूर्वापार रस्ता होता. मात्र तो संरक्षक भिंत घालून बंद करण्यात आला होता.
त्यामुळे व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, छोटे वाहतूकदार, दहावा घाटावर येणारे नागरिक आदींची गैरसोय होत होती. यामार्गे वाहतूक आणि वर्दळ बंद झाल्याने बाजारपेठही ओस पडली होती.
मात्र नागरिकांची होणारी गैरसोय पाहता हा रस्ता पुन्हा खुला करण्यात आला आहे . दरम्यान नाव घाटावरून शहरात येणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी खुला केला आहे.
करण्यात आला. हा रस्ता पूर्ववत खुला करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विशेष प्रयत्न केले.
नवले यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या पाठपुराव्याने बांधकाम विभागाने गेट टाकून वाहतुकीस रस्ता खुला केला. रस्ता खुला होताच संबंधित परिसरातील गावकर्यांनी प्रशासनाचे आभार मानले.