अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासंदर्भात प्रशासनातील अधिकार्यांशी आपली चर्चा झाली असून
रुग्णसंख्या रोखण्याच्यादृष्टीने सर्वांनाच सतर्क राहावे लागणार आहे असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
कोव्हीडच्या वाढत्या रूग्ण संख्येवरून चिंता व्यक्त करतानाच करोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. मोठ्या संख्येत होत असलेले कार्यक्रम, बाजारात खरेदीच्या निमित्ताने होणारी गर्दी या सर्वच गोष्टींबाबत पुन्हा एकदा कडक नियम पाळण्याची गरज निर्माण झाली असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले आ
हे. याबाबत महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्यांशी आपली चर्चा झाली असून येत्या एक दोन दिवसांतच नियमावलींची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील गावांमध्ये भरणारा आठवडे बाजार बंद करण्याबाबत स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकार्यांशी चर्चा करून परिस्थीतीनुरूप निर्णय करण्याबाबतच्या सूचनाही अधिकार्यांना दिल्या असल्याचे आ.विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा धोका पाहता गरजेपुरते घराबाहेर पडा, कुटुंबातील समारंभ कमी संख्येत साजरे करून नियम पाळा, सार्वजनिक ठिकाणी गावपातळीवर गर्दी न करता आगामी काळात होळी धुलीवंदन आणि इतर सर्वच सण साध्या पध्दतीने साजरे करण्याचे आवाहनही आ. विखे पाटील यांनी केले.