प्रवरा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्‍यांची ‘या’ नामंकित कंपनीमध्ये निवड

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्‍यांची ब्लायनर्स फार्मास्युटिकल प्रा.लि.नाशिक या नामंकित कंपनीमध्ये मार्केटीग प्रतिनिधी या पदावर निवड झाली असल्‍याची माहीती महाविद्यालयांचे प्राचार्य डॅा.शिवानंद हिरेमठ यांनी दिली.

मार्केटीग प्रतिनिधी या पदावर ट्रेंनिंग अॅन्ड प्लेसमेंट विभागाच्‍या माध्यामातून यामध्‍ये धनंजय मुसळे, आकाश काळे , पवन क्षिरसागर, प्रसाद लंके, विवेक आहेर या पाच यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून चेअरमन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वतंत्र प्‍लेसमेंट विभाग कार्यरत आहे.

दरवर्षीच विद्यार्थ्‍यांसाठी नामांकित कंपन्‍यांना बोलावून थेट मुलाखतींच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध करुन दिल्‍या जातात. तसेच विविध नामांकित कंपन्‍यांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या नोकरी विषयक माहीतीबाबत मार्गदर्शन दिले जाते.

प्रवरा औषध निर्माणशास्‍त्र महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्‍यांना ब्लायनर्स फार्मास्युटिकल प्रा.लि.नाशिक या नामंकित कंपनीमध्ये काम करण्‍याची मिळालेली संधी ही पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेकरीता भूषणावह बाब असून,

पाचही विद्यार्थ्‍यांची झालेली निवड औषध निर्माणशास्‍त्र महाविद्यालयाचा नावलौकीक वाढविणारी आहे. ग्रामीण भागात प्रवरेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून उत्कृष्ट विद्यार्थी तयार होतात व प्रवरेचे नाव उज्ज्वल करतात प्रवरेचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मागे नाही याचा अभिमान वाटत असल्‍याची भावना संस्‍थेचे चेअरमन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

या विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद हिरेमठ,

सहसचिव भारत घोगरे, डॉ.संजय भवर, डॉ.विजय तांबे, प्रा.दत्तात्रय थोरात यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्‍यांना ट्रेनिंग अॅण्‍ड प्‍लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.सोमेश्वर मनकर, प्रा.दिक्षा क्षिरसागर, प्रा.अमोल बलसाने व प्रा.योगेश ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office