पुरस्कारासाठी अर्ज पाठवा जिल्हा परिषदेकडून शिक्षकांना आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणार्‍या जिल्हा शिक्षक, केंद्रप्रमुख पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी जिल्हा शिक्षक व केंद्रप्रमुख पुरस्कार देण्यात येतो.

5 सप्टेंबर 2021 साठी पात्र शिक्षकांना व केंद्रप्रमुखांचे प्रस्ताव दिलेल्या विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शिक्षकांना व केंद्रप्रमुखांना या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी भाग घ्यावयाचा असेल त्या शिक्षकाने व केंद्रप्रमुखाने संकेतस्थळावरती देण्यात आलेली प्रश्नावली भरून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात 22 जुलै पर्यंत जमा करावयाची आहे.

त्याचे गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांनी पडताळणी करून ज्या शिक्षकांना जास्त गुण पडतील अशा तीन शिक्षकांचे व एक केंद्रपुमुखांचे प्रस्ताव 28 जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 31 मे पर्यंत मुख्याध्यापकांची सलग सेवा किमान 20 वर्ष.

उपशिक्षकाची सलग सेवा किमान 15 वर्ष असावी लागेल. जे शिक्षक प्रतिनियुक्तीवर आहेत व नियमित वर्गअध्यापन करत नसतील अशा शिक्षकांना प्रस्ताव सादर करता येणार नाही. शिक्षकांचे शैक्षणिक कार्य राष्ट्रीय कार्य, सामाजिक कार्य,

शैक्षणिक पात्रता, उपक्रम, विद्यार्थ्याची तयारी, गुन्हा दाखल झालेले आणि विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित असू नये.

प्रस्तावप्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचेकडून प्राप्त वर्तवणुकी बाबतचे दाखले प्रस्तावासोबत पाठवावे लागणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24