Senior Citizen FD : आता कमावता येणार बक्कळ पैसे! ‘या’ बँकेने पुन्हा केली ज्येष्ठ नागरिकांच्या व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Senior Citizen FD : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही आपल्या ग्राहकांच्या हितासाठी सतत नवनवीन योजना आणत असते. ज्याचा मोठा फायदा हा ग्राहकांना होताना दिसत आहे. जर तुम्हीही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे.

कारण या बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 9.6 % पर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्याकडे कमाईची सुवर्णसंधी आहे. याबाबत आज बँकेने निवेदन दिले आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आता सर्वसामान्य नागरिकांकडून 4.00 टक्के ते 9.10 टक्के व्याजदराने 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवी स्वीकारत आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी नवीन दर 4.50 टक्के ते 9.60 टक्के इतके देण्यात येत आहे.

याबाबत बँकेने असे म्हटले आहे की नियमित ग्राहकांना आता 5 वर्षांच्या ठेवींवर 9.10 टक्के व्याजदर मिळेल, तसेच ज्येष्ठ नागरिकांना 9.60 टक्के व्याजदर मिळेल.

जाणून घ्या नवीन व्याज दर

  • 1 वर्षाची मुदत ठेव: बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 6.85% व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.35% व्याजदर देण्यात येत आहे.
  • 2 वर्षांची मुदत ठेव: बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 8.5% व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना 9% व्याज दर देण्यात येत आहे.
  • 999 दिवसांची मुदत ठेव: बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 9% व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना 9.5% व्याज दर देण्यात येत आहे.
  • 3 वर्षांची मुदत ठेव: बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7.25% व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर देण्यात येत आहे.
  • 4 वर्षांची मुदत ठेव: बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 6.75% व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.25% व्याजदर देण्यात येत आहे.
  • 5 वर्षांची मुदत ठेव: बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 9.1% व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना 9.6% व्याज दर देण्यात येत आहे.
  • 6 वर्षांची मुदत ठेव: बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7.25% व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर देण्यात येत आहे.
  • 7 वर्षे मुदत ठेव: बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7.25% व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याज दर देण्यात येत आहे.
  • 8 वर्षे मुदत ठेव: बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7.25% व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर देण्यात येत आहे.
  • 9 वर्षे मुदत ठेव: बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7.25% तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर देण्यात येत आहे.
  • 10 वर्षांची मुदत ठेव: बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7.25% व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर देण्यात येत आहे.