४ दिवसापासून ‘या’ गावातील ज्येष्ठ नागरिक लावताय पहाटपासून रांगा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोविड लसीकरण होत नसल्याने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ६ वाजेपासून लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरीक रांगेत उभे राहतात.परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राचे १० वाजेनंतर ऐटीत येऊन लस शिल्लक नसल्याचे सांगतात.

सुमारे ४ तास हे सर्व ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे राहून आपल्या भावना ऐकण्यासाठी कोण आहे? याचा शोध घेतात.परंतु आरोग्य केंद्रातला एकही अधिकारी तेथे उपस्थित नसतो. गेल्या तीन ते चार दिवसांपासून लसीकरण केव्हा सुरू होणार आहे.

याची विचारणा करतात परंतु संबधित अधिकारी मुगराईच्या भाषेत शासनाकडे लस आल्यानंतर देऊ असे सांगून ज्येष्ठ नागरिकांना टाळण्याचा प्रयत्न करतात.ज्येष्ठ नागरिक सकाळी ६ वाजल्यापासून जेवणाचे डब्यासह रांगेत उभे राहतात.

अनेक ज्येष्ठ नागरिक व्याधीने त्रस्त असल्याने त्यांना रांगेत उभाही राहता येत नाही. परंतु नियम मोडायचा नाही म्हणून व लस मिळण्याच्या आशेने त्रास सहन करूनही रांगेत उभे राहतात.

हा सर्व प्रकार प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी बघतात परन्तु कुणालाही ज्येष्ठ नागरिकांची दया येत नाही. दरम्यान लस शिल्लक नसेल तर सकाळीच गेटवर सुचना फलक लावण्यात यावा.

विनाकारण ज्येष्ठ नागरिकांना त्रास देऊ नये.शासनाने पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज यांनी केली

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24