अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबत मंत्री गडाख यांनी स्वतः सोशल मीडियामार्फत ही माहिती दिली.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी. शासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच आपल्या घरातील सदस्यांची काळजी करावी.
मास्क वापरा, नियमित हात धुवा व घराबाहेर पडू नका, असे जाहीर आवाहन मंत्री गडाख यांनी केले.
मंत्री गडाख यांच्या कुटुंबातील पत्नी माजी सभापती सुनीता गडाख, उदयन गडाख, राधा गडाख हे सुद्धा कोरोना बाधित झाले.
नगर येथील निवासस्थानी गृहविलगिकरणात आहेत. नेहल प्रशांत गडाख या नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत.