अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्र पोलिसांनी मालेगाव, अमरावती, नांदेड आणि महाराष्ट्रातील इतर भागात 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराचा अहवाल गृह मंत्रालयाला सादर केला आहे.
या रिपोर्टमधील काही माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, हिंसाचाराची संपूर्ण प्लॅनिंग फार पूर्वीच करण्यात आली होती. या अहवालामुळे रझा अकादमीसह युवा सेनाही वादात सापडमार आहे महाराष्ट्र पोलिसांच्या तपासात आतापर्यंत सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या अशा 60 ते 70 पोस्ट आढळून आल्या आहेत,
ज्यांनी हिंसाचार भडकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोशल मीडियावर त्रिपुरामध्ये सात मशिदी पाडण्यात आल्याची बनावट पोस्ट करण्यात आली होती.
यानंतर, व्हॉट्सअॅपवर हजारोंच्या संख्येने अनेक पोस्ट फॉरवर्ड करण्यात आल्या. याचा हेतू अधिकाधिक लोक या तथाकथित सुनियोजित दंगलीत जाणूनबुजून किंवा नकळत सहभागी व्हावे, असा होता. गृह मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात अशा 36 सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख आहे.
अमरावतीत झालेल्या दंगलीमागे रझा अकादमीसह अनेक राजकीय पक्षांचाही हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. अमरावती हिंसाचारात रझा अकादमीबरोबरच भाजपा आणि युवा सेनेच्याही लोकांचाही हात होता.
यामुळे केवळ काही मुस्लिम संघटनांनाकडूनच नाही तर राजकीय पक्षांनीही अमरावतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केला होता, असा अहवाल पोलिसांकडून गृहविभागाला सादर करण्यात आला आहे. अमरावती पोलिसांनी हा अहवाल गृहखात्याकडे सुपूर्द केला आहे.