अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- ठाणे शहरात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत ठाणे क्राईम ब्रांचने दोन अभिनेत्रींना अटक केली आहे.
धक्कादायक म्हणजे एका खासगी सोसायटीत हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होतं. या सेक्स रॅकेटची लिंक मुंबईतील अनेक बड्या अभिनेत्रींशी असल्याचे बोलले जात आहे. हे एक मोठं सेक्स रॅकेट असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
एका खासगी सोसायटीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांच्या पथकाने ३ एजंटसह २ अभिनेत्रींना अटक केली आहे.
पोलिसांनी दोन अभिनेत्रींना अटक केली आहे. ज्या एका खासगी सोसायटीत हे सेक्स रॅकेट चालवायच्या. बॉलिवूडशी संबंधीत या दोन्ही अभिनेत्री असून वेश्या व्यवसायाकरता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घ्यायच्या अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
कोविड -१९ च्या काळात चित्रिकरण बंद असल्याने या दोन्ही अभिनेत्री वेश्या व्यवसायाकडे वळल्या असं तसापात समोर आल आहे. धक्कादायक म्हणजे या सेक्स रॅकेटचीं लिंक मुंबईतील अनेक मोठ्या अभिनेत्रींशी असल्याचे बोलले जात आहे.
एका सोसायटीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होतं आणि त्यामध्ये दोन अभिनेत्रींचा समावेश असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता ठाणे क्राईम ब्रांच अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत.