अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि सकारात्मक संकेतांनी आज भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी झेप घेतली आहे.
बीएसई सेन्सेक्स 392.92 अंकांच्या वाढीसह 52,699.00 वर बंद झाला. या व्यतिरिक्त निफ्टी 103.50 अंकांनी चढून 15,790.45 च्या पातळीवर बंद झाला आहे.
दरम्यान, बुधवारी सेन्सेक्सने 600 अंकांचा चढ उतार अनुभवला होता. काल बाजार बंद होताना सेन्सेक्स 282 अंकांच्या घसरणीसह 52306 अंकांवर बंद झाला. निफ्टी 85.80 अंकांनी घसरला आणि 15686 अंकांवर स्थिरावला होता.
या शेअर्स मध्ये तेजी :- आजच्या सत्रात आयटी सेवा, बँका, वाहन तसेच इन्फ्रा क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. आयटी क्षेत्रात इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, हॅप्पीएस्ट माईंड, एल अँड टेक्नॉलॉजी, एम्फसिस, माईंड ट्री या शेअरमध्ये वाढ झाली आहे.
सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर तेजीत होते. ज्यात एल अँड टी , टाटा स्टील, एसबीआय, ऍक्सिस बँक, एचयूएल, बजाज फायनान्स, डॉ. रेड्डी लॅब, आयटीसी या शेअरमध्ये वाढ झाली आहे.
घसरण झालेले शेअर्स :- याशिवाय रिलायन्स, भारती एअरटेल, एसबीआय, पॉवर ग्रिड, डॉ. रेड्डी, सन फार्मा, आयटीसी आणि टायटन हे सर्व विक्री झालेल्या शेअर्सच्या लिस्टमध्ये बंद झाले.
दरम्यान आजच्या रिलायन्सच्या AGM मध्ये मुकेश अंबानी यांच्या भाषणानंतर हा स्टॉक रेड मार्कवर बंद झाला, त्यानंतर गुंतवणूकदारांचे जवळपास 30 हजार कोटी रुपये बुडाले.