गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावेत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता पुरेशा सोयीसुविधा नसल्याने रुग्ण व नातेवाईकांची हेळसांड होत आहे.

विलगीकरण नसल्यामुळे इतरांच्या संपर्कात येणाऱ्यांमुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत आहे. विलगीकरण कक्ष वाढवल्यास रुग्णसंख्येला आळा बसेल.

याकरिता गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावे, अशी मागणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक बिपीन कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांचेकडे केली.

जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे.

प्रशासनाकडून सोयीसुविधा अपूर्ण आहेत. तसेच विलगीकरण कक्षच नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतरांना संसर्ग होऊन रुग्ण संख्या वाढत आहे. त्याकरिता गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू केल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24