अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- अमरावती मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे.
नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे.
त्यामुळे नवनीत राणा यांच्या खासदारकीवर येणारं संकट तुर्तास टळलं आहे. त्यानंतर, प्रतिक्रिया देताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेना व मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे
नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेना व मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही गंभीर स्वरुपाचे आरोप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा काळा पैसा परदेशात आहे.
हॉटेल, घर स्वरूपात त्यांनी विदेशात संपत्ती जमा केली आहे. माझ्याकडे ठाकरेंच्या काळ्या संपत्तीचे पुरावे असून लवकरच ईडी आणि सीबीआयकडे सोपवणार असल्याचे आमदार रवि राणा यांनी म्हटले.
तर, लोकसभेत सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रश्न उपस्थित करते. महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्यामुळे असे प्रकार केले जात आहे. मी राजकारणात आल्यामुळे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय.
मात्र, मी २०० वर्षे जुने दस्तावेज घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले, अशी प्रतिक्रिया नवनीत कौर यांनी दिली. आता, शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी पराभव पचवायला पाहीजे, असेही नवनीत कौर म्हणाल्या..
आमदार रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप
उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादाने मला अडकवलं जातंय – नवनीत राणा