छिंदम बंधूवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा ! सात दिवसांची पोलीस कोठडी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  दिल्लीगेट येथील ज्युस सेंटरचे नुकसान करून एकाला मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत या दोघांना पोलिसांनी अटक केली.

या दोघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची (दि. 20 पर्यंत) पोलीस कोठडी सुनाविण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी व शहराचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी दिली.

भगीरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरून छिंदम बंधूसह इतर चाळीस जणांविरुध्द मारहाण करणे, अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता.

हे दोघे दिल्लीगेट भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे व इतर कर्मचार्‍यांनी दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

छिंदम बंधूवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती तपासी अधिकारी ढुमे यांनी न्यायालयाकडे केली होती.

Ahmednagarlive24 Office