सिरम इन्स्टिट्युटनं ‘या’ कंपनीचे 50 टक्के शेअर्स केले खरेदी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-कोरोना विरुद्ध देशात व्यापक लसीकरणाची मोहिम जरी हाती घेण्यात आली असली, तरी अजूनही दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे.

लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याच्या देखील तक्रारी काही राज्यांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटने कोरोना लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

सीरम इन्स्टिट्युटने देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची 50 टक्के मालकी अर्थात 50 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. पुनावाला यांनी ट्विट करत केली घोषणा “देशातील लस उत्पादक उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं फार आवश्यक आहे.

हेच साध्य करण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं शॉट कायशामधील 50 टक्के समभाग खरेदी केले आहेत. भारतीय लस उद्योग विश्वासाठी औषध पॅकेजिंग उत्पादनांचा अखंड पुरवठा होणं यामुळे शक्य होणार आहे”, असं अदर पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातली माहिती दिली असून दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेलं पत्रकच अदर पूनावाला यांनी आपल्या ट्वीटसोबत शेअर केलं आहे.

फार्मा पॅकेजिंग क्षेत्रातील भारतामधील Schott Kaisha ही महत्त्वाची कंपनी आहे. शॉट कायशाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सीरम इस्टिट्युट औषधांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी करत आहे. यामध्ये लसींच्या साठवणुकीसाठी लागणाऱ्या व्हायल्सचा समावेश आहे.

अहमदनगर लाईव्ह 24