अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- ज्योतिषशास्त्र ज्याप्रमाणे हाताच्या रेषा, गुणांद्वारे व्यक्तीचे स्वरूप, वर्तन, भविष्य सांगते, त्याचप्रमाणे तीळ, अवयवांच्या रचनेतूनही अनेक संकेत मीळतात.
समुद्रशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर असणारे तीळ त्याच्या स्वभावाबद्दल आणि भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगते. आज आपण जाणून घेऊयात की, ओठांवर किंवा ओठांच्या आसपास तीळ असणे याचाच कार्य अर्थ होतो –
जर ओठांजवळ तीळ असेल तर ‘असा’ असतो स्वभाव :- ओठाजवळ तीळ असणे सौंदर्याच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते. जर तीळ ओठांच्या वरच्या बाजूला असेल तर ते सौंदर्यात भर घालते. तथापि या या तीळ चे अनेक शुभ आणि अशुभ अर्थ आहेत.
– ओठांच्या वरती तीळ असणे: असे लोक खूप भाग्यवान असतात. या लोकांना आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या लोकांना आयुष्यातील प्रत्येक सुखसोई मिळते. कधीकधी अशा लोकांचे एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध असतात.
– वरच्या ओठांच्या उजव्या बाजूला तीळ: अशा लोकांना खूप चांगला आणि काळजी घेणारा जीवनसाथी मिळतो.
– वरच्या ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असणे: असा तीळ चांगला मानला जात नाही. हे लोक चांगल्या स्वभावाचे असतात आणि लोक त्यांच्यावर सहजपणे प्रभावित होतात पण त्यांची ही जादू त्यांच्या जोडीदारावर चालत नाही.
– खालच्या ओठाच्या उजव्या बाजूला तीळ: असे लोक त्यांच्या कारकीर्दीत खूप यशस्वी होतात आणि त्यांना प्रसिद्धी देखील मिळते.