अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-शहरासह नगर तालुक्यात कोरोनाचे संक्रमण दिवसंदिवस वाढत असताना, कोरोना संक्रमणाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगाव गुप्ता ग्रामपंचायतच्या वतीने गावात जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे.
वडगाव गुप्ता या गावात दि.10 मे पर्यंत सात दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे. यामध्ये आरोग्य सुविधा वगळून सर्व अत्यावश्यक सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर वडगाव गुप्ता चे सरपंच विजयराव शेवाळे, उपसरपंच बाबासाहेब गव्हाणे, तलाठी प्रताप कळसे, ग्रामसेवक अप्पा आबूज, पोलीस पाटील ज्ञानदेव शेवाळे यांनी गावाची पहाणी करुन ग्रामस्थांना घरातच थांबण्याचे आवाहन केले.
ग्रामसुरक्षा समितीची सभा होऊन गावात दवाखाने, मेडिकल (आरोग्यसुविधा वगळून) सर्व अत्यावश्यक सुविधा सात दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी सात ते अकरा पर्यंत दूध विक्री चालू राहणार आहे.
pआरोग्यसुविधा व दुग्ध व्यवसाय सोडून इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे. सर्व ग्रामस्थांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.