अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढली असून वाडगाव व बेलपिंपळगाव रस्ता कोरोना हॉट स्पॉट झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाकळीभान शुक्रवार दिनांक १४ मे ते गुरूवार दिनांक २० मे या दरम्यान ७ दिवस टाकळीभान कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सर्व पक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकित घेण्यात आला आहे.
ग्रामपंचायतच्या स्व.गोविंदराव आदिक सभागृहात आयोजित केलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकित टाकळीभान ७ दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कालावधीमध्ये फक्त दवाखाने, मेडिकल, व दुध संकलन केंद्र सुरू ठेवण्यात येणार असून इतर सर्व व्यवसाय पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
मटका, दारू विक्री बंद ठेवण्यात आलेली असून मटन विक्रेत्यांनी नागरिकांच्या मागणीवरून घरी जावून मटनपार्सल द्यावे.
इतर दुकाने चालू आढळून आल्यास आकराशे रूपये व दुसऱ्यांदा दुकान चालू आढल्यास पाच हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
ज्या भागात रूग्ण संख्या जास्त आहे त्या भागात रेड झोन फ्लेक्स बोर्ड लावण्यात येणार असल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे व ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव यांनी यावेळी सांगितले.
ग्रामस्थांनी नियमाचे पालन करावे,असे आवाहन सरपंच रनणवरे,सदस्यांनी व कोरोना समितीने केले आहे.यावेळी माजी सरपंच मंजाबापू थोरात, अशोक कारखान्याचे बापूराव त्रिभुवन,
लोकसेवा महाविकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे,कामगार तलाठी अरूण हिवाळे, माजी उपसरपंच भारत भवार,राहूल पटारे,आबासाहेब रणनवरे, संजय रणनवरे, राजू रणनवरे, नारायण काळे,
कोरोना समितीचे अध्यक्ष नवाज शेख,ऋषि धोंडलकर, संजय पटारे,बंडू हापसे, विकास मगर, बापूसाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल बोडखे,भाऊसाहेब पटारे आदी उपस्थित होते.