अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- तालुक्यात विविध भागात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कोळगाव येथे तिसऱ्या टप्प्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेता ही साखळी पूर्णपणे थांबविण्यासाठी तहसीलदार प्रदीप पवार यांनी गावात आजपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार कोळगाव ग्रामपंचायत प्रशासनाने गावात ४ ते १० ऑगस्ट असा सात दिवस जनता कर्फ्यु लागू केला असून या काळात औषध दुकाने , दूध असे अत्यावश्यक सेवावगळता इतर दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधाच्या तिसऱ्या टप्प्यात कोळगाव येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून, सध्या गावात सुमारे ३० ते ३५ कोरोना रुग्ण असून दररोज सरासरी ५ ते १० रुग्ण पॉझीटीव्ह निघत असल्याने गावात कडक निर्बंध लागू करून साखळी पूर्ण पणे थांबविण्यासाठी श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिल्याने कोळगाव ग्रामपंचायत प्रशासनाने गावात ४ ते १० ऑगस्ट असा सात दिवस जनता कर्फ्यु लागू केला असून,
या काळात औषध दुकाने , दूध असे अत्यावश्यक सेवावगळता इतर दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जनता कर्फ्युच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी जनता कर्फ्यु ला उत्स्पूर्त प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापणे बंद ठेवली होती.