अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- कोणत्या वेळी लैंगिक संबंधांचा आनंद लुटावा याची तुम्हाला माहिती आहे का? त्यातून तुमच्या जवळकीच्या नात्यावर परिणाम होतो.
हृदय तज्ज्ञांच्या मते लैगिंक संबंधांसाठी कोणती वेळ चुकीची असू शकते आणि कोणती वेळ टाळली पाहिजे याविषयी ही माहिती नक्की वाचा बहुतेक जोडप्यांना शारीरीक जवळकीसाठी रात्रीची वेळ सोयीची वाटते, परंतु त्यावेळी शारीरीक संबंध ठेवणे वाईट ठरू शकते.
एका अभ्यासानुसार स्त्रिया आणि पुरुषांच्या मनात लैंगिक इच्छा निर्माण होण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. स्त्रियांची लैंगिक इच्छा संध्याकाळी उच्चतम पातळीला असते, तर पुरुष सकाळच्या वेळेस sex साठी इच्छुक असतात. बहुतेक जोडपी सकाळी नऊ ते मध्यरात्रीपर्यंतच्या वेळेत sex करतात.
मात्र त्यासाठी ठराविक अशी कुठली वेळ नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे. जी जोडपी त्यांच्या दैनंदिन कामचा विचार करून समागमाची वेळ निवडतात, ती लैंगिकदृष्ट्या सर्वांत समाधानी असतात असे अभ्यासात दिसले. द पॉवर ऑफ द व्हेन या पुस्तकाचे लेख मार्क ब्रुस म्हणतात,
रात्री झोपण्याच्या वेळी sex करणे काही वाईट नाही, परंतु यावेळी दिवसभराच्या श्रमाने तुम्ही दमलेले असता आणि तुमच्या शरीराला झोपेची आणि विश्रांतीची गरज असते. यावेळी शारीरीक क्रिया करण्यासाठी तुमच्या शरीरात पुरेशी ऊर्जा नसते. डॉ. ब्लुस आणि थॉमस दोघांच्याही मते दिवसभराच्या श्रमानंतर रात्री झोपल्यावर शारीरीक संबंधांमध्ये सुधारणा होते.
जेव्हा तुम्ही रात्री झोपी जाता तेव्हा शरीर हार्मोन्स तयार करण्याच्या कामाला लागते आणि तुम्हाला जाग येते तेव्हा तुमच्या शरीरात ऊर्जा आणि उत्साह असतो. त्यामुळे लैंगिक सुखातून समाधान मिळण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सेक्ससाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम, असे डॉ. ब्रुस यांचे म्हणणे आहे.
डा. थामस याचे असे म्हणणे आहे कि, सकाळी sex करणे प्रत्येक जोडप्याला शक्य होईलच असे नाही. कारण प्रत्येकाचे दिवसाचे वेळापत्रक वेगवेगळे असते. त्यामुळे प्रत्येकाने दोघांना आनंददायी वाटेल अशी वेळ निवडावी. त्यासाठी सकाळची काही कामे बाजूला ठेवली तरी चालू शकते.
अर्थात लैंगिक जीवन अधिक चांगले बनवण्यासाठी जोडप्यांना काही कालावधी लागू शकतो. जी जोडपी तणावापासून मुक्ती साठी समागम करतात त्याचे लैंगिक जीवदीर्घकाळ टिकणारे असते. समागमासाठी सर्वांत चांगली वेळ कोणती याबाबत तज्ज्ञामध्ये मतभिन्नता आढळते. जोडप्यांनी परस्पर सामंजस्याने ही वेळ निवडावी, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. अमेरिकेतील रिलेशनशिप अँड सेक्स थेरपिस्ट लिसा थॉमस म्हणतात, की रात्रीच्यावेळी sex करणे काही जणांसाठी दमवणारे ठरू शकते. त्याचबरोबर काही जणांसाठी समागमामुळे मनावरील ताण दूर होतो आणि शरीर रिलॅक्स होते. अनेकांना sex केल्यानंतर गाढ झोप लागते.