लष्करी जवानाच्या ‘त्या’ कृत्याने शरमेने मान झुकली!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  आजही सर्वसामान्यांच्या मनात भारतीय लष्कराबद्दल अत्यंत आदर, प्रेम व तितकाचा अभिमान आहे व यापुढेही तो कायम राहील. मात्र पारनेर तालुक्यातील सुट्टीवर आलेल्या जवानाने केलेल्या त्याच्या ‘त्या’ कृत्यामुळे मात्र सर्वांचीच मान शरमेने झुकली आहे.

तीन वर्षांपासून एका तरुणीचा पाठलाग करून, लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरोधात बळजबरीने बलात्कार करणाऱ्या गोरेगाव येथील एका जवानाच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल गंगाधर नांगरे असे त्या जवानाचे नाव आहे. जवानावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पिडीत तरूणीने पारनेर पोलिस ठाण्यात येउन फिर्याद दाखल केली असून,

यात तिने नमूद केले आहे की, आरोपी अनिल याने मार्च २०१८ ते २९ जुन २०२१ पर्यंत तिच्यावर अत्याचार केल्याचे म्हटले आहे. पिडीतेचा पाठलाग करून, तिच्याशी ओळख करून लग्न करण्याचे अश्वासन देऊन तिची इच्छा नसताना कान्हूर रस्त्यावरील एका हॉटेलवर घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरोधात बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

अत्याचारानंतर पिडीतेसोबत लग्नास नकार देत बदनामीकारक मजकुर व्हॉटस ॲप ग्रुपवर व्हायरल करून पिडीतेसह तिच्या घरातील सदस्यांची बदनामी करण्याची तसेच हॉटेलमध्ये काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अनिल नांगरे हा फिर्यादीला देत होता.

दरम्यान नांगरे याच्या जाचाला कंटाळून पिडितेने पारनेर पोलिस ठाण्यात येऊन त्याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप हे करीत आहेत. आरोपी नांगरे हा लष्करात असुन सध्या तो ड्युटीवर आहे.

अहमदनगर लाईव्ह 24