शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा. गडाख म्हणजे एक नाटक कंपनी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- महाविकास आघाडीच्या नाकार्तेपणाच्या धोरणामुळे मराठा व ओबीसी आरक्षण रद्द झाले.

त्यामुळे नवटंकी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.

मराठा व ओबीसी आरक्षण रद्द झालच्या िनषेधार्थ महाविकास सरकार विराेधात भाजपच्यावतीने नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौकात सुमारे पाऊणतास आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षण मागील भाजपच्या काळात उच न्यायालयापर्यंत टिकले. मात्र महाविकास आघाडी सरकारला आरक्षण टिकवता आले नाही. आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी राजकीयदृष्ट्याा अडचणीत येणार आहेत.

नेवासे तालुक्याला मंत्री असतानाही तालुका वाऱ्यावर आहे. काय दशा झाली तालुक्याची बघवत नाही.गत मराठा आरक्षणवेळी भाजप सरकारच्या काळात तत्कालीन पंचायत समिती सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे मराठा आरक्षण या सरकारने टिकवता आले नाही.सुनीता गडाख यांनी राजीनामा दिला तसा मराठा आरक्षण प्रश्नी मंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा. गडाख म्हणजे एक नाटक कंपनी असल्याची टीका मुरकुटे यांनी केली.

आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे. जनार्धन जाधव, देविदास साळुंके, लक्ष्मण मोहिते, सुनील वाघ, प्रदीप ढोकणे, बाळासाहेब कुलकर्णी, विवेक ननावरे, प्रताप चिंध्ये,

भास्कर कनगरे, सुभाष पवार, तुळशीराम झगरे, रवी शेळके, राजेंद्र मते, आदिनाथ पटारे, पोपट शेकडे, विकास गायकवाड, येडूभाऊ सोनवणे, रमेश घोरपडे, आकाश देशमुख यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24