शरद पवार पुन्हा रुग्णालयात ! तोंडातील अल्सर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तोंडातील अल्सरही काढून टाकण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे. पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांना बुधवारी पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची नियमित तपासणी झाली होती.

त्यानंतर आज त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळून आला होता. आज तो अल्सर काढण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. सध्या शरद पवार हे रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.

तसेच पवार साहेब रोज कोरोना संसर्गाचा आढावा घेत आहेत. ते लवकरच बरे होऊन आपल्या दैनंदिन कार्यास सुरुवात करतील, असंही मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

पवार पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते.

मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24