ताज्या बातम्या

पक्ष सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्याला शरद पवारांची श्रद्धाजंली ! म्हणाले…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News : एकेकाळचे कट्टर समर्थक मात्र, नंतर पक्ष सोडून गेलेले राष्ट्रवादीतील आपले जुने सहकारी, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबद्दलल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्‍या कोल्हे यांच्या निधनानं सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. राज्यातल्या कृषी उत्पादनातल्या प्रयोगशीलतेला व्यापक चालना दिली ती शंकरराव कोल्हे यांनीच.

शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात विद्यार्थीदशेतच त्यांना स्थान मिळालं होतं. साखर या विषयासाठी जगभ्रमंती करून शंकररावांनी प्रचंड व्यासंग केला.

ग्रामीण विकासासाठी आंतरिक तळमळ आणि प्रबळ इच्छाशक्ती हे त्यांचे गुणविशेष सामाजिक क्षेत्रात नव्यानं येणाऱ्या कार्यकर्त्यांनी अंगिकारावे असे होते,’ असं पवार यांनी म्हटलं आहे.

काळे-कोल्हे युग आज संपलं : गडाख

जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, यशवंतराव गडाख यांनीही कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटलं आहे, ‘काळे-कोल्हे युग आज संपलं. जुन्या पिढीतील एक कर्तबगार नेतृत्व आपल्यातून निधून गेलं आहे.

राजकीय संघर्ष, राजकारणातले मतभेद त्यांनी सहकारात व विकास कामात कधी येऊ दिले नाहीत. आजच्या नवीन पिढीनं त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. नगर जिल्ह्याचा विकासाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, त्यामध्ये कोल्हे यांचं नाव अग्रभागी असेल,’ असंही गडाख यांनी म्हटलं आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office