अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-सर्वसामान्यांचा नेता म्हणून जनमानसात स्वतःची एक वेगळी ओळख असलेले पार्नरचे आमदार निलेश लंके यांच्या कार्याची सध्या राज्यात चर्चा होत आहे.
आजवर लंकेच्या कामाची दखल अनेक राजकीय नेत्यांनी घेतली आहे. यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच आमदार निलेश लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी,ता. पारनेर येथे शरद पवार यांच्या नावाने ११०० बेडचे कोविड सेंटर उभारले असून त्यात १०० ऑक्सिजन बेड आहेत. स्वतः निलेश लंके या सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची आस्थेची विचारपूस करतात.
याशिवाय या कोविड केअर सेंटरच्या कामकाजावर स्वतः देखरेख करतात.त्यांचे हे कार्य सर्वांसाठीच आदर्शवत आहे. निलेश, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आहात ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
अस सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे. राज्यात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक केला असून राज्य संकटात आहे. अशा वेळी पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी समाजकाणाच जोरदार उदाहरण सर्व राजकीय नेत्यांपुढे ठेवलं आहे.
निलेश लंके यांनी तब्बल 1100 बेड ची व्यवस्था असलेलं सुशोभित कोव्हीड सेंटर उभारून सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचं काम सुरू केलं. यावेळी ते स्वतः तिथं उपस्थित राहून रुग्णांची देखभाल करू लागले.
‘माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत,’ असा निर्धारच निलेश लंके यांनी केला आहे.
यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निलेश लंके यांच कौतुक केले आहे.