ताज्या बातम्या

‘जय जवान जय किसान’चा नारा सफल होण्यासाठी पंतप्रधानपदी शरद पवारांची गरज

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :-  सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आणि गोरगरीब शेतकरी-कष्टकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन योग्य निर्णय घेऊन सोडविणारे शरद पवार हे एकच नेते आहे.

‘जय जवान जय किसान’चा नारा सफल होण्यासाठी शरद पवार पंतप्रधान होण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांचे ८१ वा वाढदिवसाचे औचित्य साधून भेंडा येथील नागेबाबा भक्तनिवास सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुढे बोलताना घुले म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन जनसामान्यांचे प्रश्न, ग्रामीण जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी, धरणग्रस्त शेतकऱ्यांची पाणी परवानगी प्रश्न,

शेतीमालाचे भाव, आरक्षणाचा प्रश्न तसेच ग्रामीण भागाचा विकास याकामी शरद पवार साहेबांचे महत्त्वाचे योगदान आहे. सत्ता हे साध्य नसून ते विकासाचे साधन आहे.

आपले प्रश्न आपलीच माणसे सोडवत असतात म्हणुन राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचवा असे आवाहन घुलेंनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office