Share Market : अनेकांना शेअर मार्केटमधून जास्त पैसा कमवावा असे वाटत असते. परंतु, त्यासाठी तुम्हाला मार्केटची संपूर्ण माहिती असावी लागते. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. दरम्यान,बजाजचा एक शेअर अवघ्या एका दिवसात 370 रुपयांनी वाढला आहे.
सोमवारी बीएसईवर बजाज फायनान्सचा शेअर तब्बल 5 टक्क्यांच्या वाढीसह 7848.35 रुपयांवर पोहोचला आहे. जर तुमच्याकडे हा शेअर असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तज्ज्ञांच्या मतानुसार, हा शेअर आणखी वाढेल.
1 अब्ज डॉलर्स पर्यंत निधी उभारेल
बजाज फायनान्सने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये असे म्हटले आहे की, ‘कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार, 5 ऑक्टोबर 2023 रोजी होणार असून या बैठकीमध्ये निधी उभारणीच्या प्रस्तावावर विचार केला जाईल. बजाज फायनान्स प्राधान्य इश्यू किंवा पात्र संस्था प्लेसमेंटद्वारे निधी उभारेल.
एका अहवालात असे म्हटले आहे की ही कंपनी $800 दशलक्ष-1 अब्ज पर्यंत मेगा फंड उभारेल. या प्रस्तावित करारासाठी 4 गुंतवणूक बँकांची निवड केली असून विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजने एका नोटमध्ये असे म्हटले आहे की, ‘बजाज फायनान्सने त्याच्या निव्वळ संपत्तीच्या 10-15 टक्के वाढ केली आहे असे गृहीत धरले तर, इश्यूचा आकार $800 दशलक्ष ते $1 अब्ज असण्याची शक्यता आहे.’
9500 रुपयांचे लक्ष्य
बजाज फायनान्स निधी उभारण्याच्या तयारीत आहे अशा वृत्तानंतर विदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने कंपनीचे शेअर्स खरेदी करा असा सल्ला दिला आहे. इतकेच नाही तर CLSA ने बजाज फायनान्सच्या शेअर्ससाठी 9500 रुपयांचे लक्ष्य देण्यात आले आहे.
याचाच असा अर्थ की, बजाज फायनान्सचे शेअर्स शुक्रवारच्या बंद पातळीपासून 27% पेक्षा जास्त वाढू शकतील. ब्रोकरेज हाऊस जेफरीजनेही बजाज फायनान्सच्या शेअर्सला बाय रेटिंग देण्यात आले असून कंपनीच्या शेअर्ससाठी 8830 रुपये लक्ष्य किंमत देण्यात आली आहे. तसेच ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी बजाज फायनान्सच्या शेअर्सचे बाय रेटिंग कायम ठेवले असून कंपनीच्या या शेअर्सला 8800 रुपयांचे लक्ष्य दिलेले आहे.