Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Share Market : IPO असावा तर असा! एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल, दिला जबरदस्त परतावा

Share Market : सध्याच्या काळात अनेकजण आयपीओमध्ये गुंतवणूक करत आहेत. अशातच आता आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण जर तुम्हीही या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हालाही जबरदस्त परतावा मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स लिमिटेड या आयपीओने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या आयपीओने केवळ एक महिन्यातच स्फोटक परतावा दिला आहे. दरम्यान बाजार बंद होताना या कंपनीच्या शेअरची किंमत 151.70 रुपयांपर्यंत खाली आली होती.

दरम्यान एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स लिमिटेड बीएसई एसएमईवर रु. 67.20 वर सूचीबद्ध झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या या शेअरची किंमत 151.70 रुपयांच्या पातळीवर गेली आहे. इतकेच नाही तर, या IPO चा प्राइस बँड 61 ते 64 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना आयपीओच्या वेळी शेअर्स वाटप करण्यात आले असेल, त्यांना आतापर्यंत होल्ड करून दुप्पट नफा मिळू शकणार आहे.

Exhicon Events Media Solutions Ltd चे शेअर 15 तारखेपासून (18 मे 2023 वगळता) अपर सर्किटमध्ये असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जबरदस्त परताव्यामुळे, कंपनी शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली आहे. तसेच हे लक्षात ठेवा की Exhicon Events Media Solutions Ltd चे मार्केट कॅप रु. 180.15 कोटी इतके आहे.