Share Market : शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूकदारांना कमीत कमी वेळात जास्त परतावा मिळतो. तर काही असे शेअर आहेत ज्यामुळे गुंतवणूकदारांना खूप आर्थिक फटका सहन करावा लागतो. गुंतवणूकदारांचे खूप नुकसान होते.
त्यामुळे जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला शेअर बाजाराचे संपूर्ण माहिती असावी लागते. तुम्हाला बाजाराची संपूर्ण माहिती असेल तर तुम्हाला यातून नफा मिळवता येईल. दरम्यान, आता अरविंद अँड कंपनीच्या शेअर्सने बाजारात एंट्री केली आहे.
या कंपनीचे शेअर्स एक्स्चेंजवर 80 रुपयांवर सूचीबद्ध केला आहे. किमतीचा विचार केला तर कंपनीचे शेअर्स आयपीओमध्ये 45 रुपये किमतीत खरेदी केला. सध्या या कंपनीचे शेअर्स सुमारे 78 टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध केला आहे.
तब्बल 385 वेळा सबस्क्राइब झाला IPO
हे लक्षात घ्या की अरविंद आणि कंपनी शिपिंग एजन्सीचा IPO एकूण तब्बल 385.03 वेळा सबस्क्राइब झाला आहे. कंपनीच्या IPO चा किरकोळ कोटा 321.97 पट सबस्क्राइब झाला असून IPO च्या इतर श्रेणींमध्ये 436.05 पट सबस्क्रिप्शन प्राप्त झाले आहे. IPO पूर्वी कंपनीतील प्रवर्तकांची हिस्सेदारी 100% होती, जी आता 73% पर्यंत कमी करण्यात येणार आहे. कंपनी IPO मधून उभारलेला निधी भांडवली खर्चासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरू शकते.
गुंतवणूकदारांना लावता येणार 3000 शेअर्ससाठी बोली
हे लक्षात घ्या की अरविंद आणि कंपनीचा IPO 12 ऑक्टोबर 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडण्यात आला होता, आणि तो १६ ऑक्टोबरपर्यंत खुला राहिला होता. या IPO मध्ये कंपनीच्या समभागांचे वाटप 19 ऑक्टोबर रोजी अंतिम झाले आहे.
त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार अरविंद अँड कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉटसाठी बोली लावू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की IPO च्या एका लॉटमध्ये 3000 शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना IPO मध्ये 135,000 रुपये गुंतवावे लागणार आहे. कंपनीच्या सार्वजनिक इश्यूचा एकूण आकार 14.74 कोटी रुपये इतका आहे.