Share market today : सेन्सेक्सने पहिल्यांदाच ६१००० केले क्रॉस ! वाचा दिवसभरातील चर्चेतील शेअर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- भारतीय शेअर बाजार सलग सहाव्या दिवशी वाढीसह बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी 50 विक्रमी उच्चांकावर बंद झाले.

गुरुवारी सेन्सेक्सने प्रथमच 61000 ओलांडले आणि ऑटो वगळता सर्व क्षेत्रांमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे निफ्टीदेखील प्रथमच 18300 च्या वर बंद झाला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी शेअर्स बीएसई सेन्सेक्समध्ये 568.90 अंकांनी वाढून नवीन विक्रम 61,305.95 वर पोहोचले आणि एनएसई निफ्टी 176.80 अंकांच्या वाढीसह 18,338.55 अंकांवर बंद झाला.

आज गुरुवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने पहिल्यांदाच ६१००० अंकाची विक्रमी पातळी गाठली. तो ३०० अंकांनी वधारला आहे. निफ्टीमध्ये देखील ११६ अंकांची वाढ झाली असून तो १८२७८ अंकावर गेला आहे. बाजारात मोठ्या तेजीसह गुंतवणूकदारांनी बंपर नफा कमावला. त्यांच्या संपत्तीत 2 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली.

बुधवारी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 2,70,73,296.03 कोटी रुपये होते. गुरुवारी ते 2,03,408.83 कोटी रुपयांनी वाढून 2,72,76,704.86 कोटी रुपये झाले. त्याचबरोबर बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्याच्या एका आठवड्यात 10 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली.

आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सनं थेट ६१ हजारांच्या वर विक्रमी झेप घेतली. त्यामुळे खरेदी-विक्रीमध्ये मोठ्या हालचाली दिसून आल्या. यामध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयटीसी, एल अँड टी, एनटीपीसी, टाटा स्टील, मारुति सुझुकी, एचसीएल टेक,

अल्ट्राटेक सिमेंट, आरआयएल या कंपन्यांच्या शेअर्सचा भाव चांगलाच वधारल्याचं दिसून आलं. मात्र, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एम अँड एम, हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात एचटीएफसी, भारती एअरटेल आणि इंडसइंड बँक या कंपन्यांना शेअर्स वर ठेवण्यासाठी आज बराच काथ्याकूट करावा लागला.

आज बाजारात आयटी कंपन्यांच्या शेअरला मोठी होती. विप्रो, इन्फोसिस या शेअरमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर टाटा समूहाच्या विविध शेअरमध्ये खरेदी सुरु होती.

आयटी क्षेत्रात टीसीएस वगळता इन्फोसिस, विप्रो आणि माइंडट्री या कंपन्यांची दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आयटी शेअरमध्ये गुंतवणूक वाढवली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.