Share Market Update : भारतीय शेअर बाजारामध्ये (Indian Share Market) आज गुरुवारी सेनेसेक्समध्ये (Sensex) किरकोळ तेजी पाहायला मिळाली. बुधवारी शेअर बाजार बंद होण्याच्या वेळी हिरव्या चिन्हावर बंद झाला होता. त्यातच HDFC ने FD वरील व्यजदरामध्ये वाढ केली आहे. चला तर जाणून घेऊया आजचा शेअर बाजार कसा होता.
सात दिवसांच्या तेजीनंतर बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. आजच्या व्यवहारात रियल्टी, मेटल समभागात खरेदी झाली. दुसरीकडे आयटी, ऑटो, फार्मा समभागांवर दबाव होता तर एफएमसीजी, बँकिंग समभागात तेजी होती.
व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 37.87 अंकांच्या किंवा 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 60,298.00 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 12.25 अंकांच्या किंवा 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 17956.50 च्या पातळीवर बंद झाला.
बुधवारी शेअर बाजार हिरव्या चिन्हासह बंद झाला
मागील सत्रात म्हणजे बुधवारी बीएसई सेन्सेक्स 417.92 अंकांच्या वाढीसह 60,260 वर बंद झाला आणि निफ्टी 119 अंकांनी वाढून 17,944.25 वर बंद झाला. BSE सेन्सेक्स 417.92 अंकांच्या वाढीसह 60,260 वर बंद झाला आणि निफ्टी 119 अंकांच्या वाढीसह 17,944.25 वर बंद झाला.
HDFC ने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC बँकेने 2 महिन्यांच्या अंतरानंतर FD (Fixed Deposit) च्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एफडी दर 40 बेस पॉइंट्स (0.40 टक्के) पर्यंत वाढवले आहेत. नवीन व्याजदर 18 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहेत. हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD रकमेसाठी लागू आहेत.
ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसचा IPO 24 ऑगस्ट रोजी उघडणार आहे
एअरपोर्ट सर्व्हिस एग्रीगेटर प्लॅटफॉर्म ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस लिमिटेडचा IPO 24 ऑगस्ट रोजी उघडेल. IPO दस्तऐवजानुसार, तीन दिवसीय सार्वजनिक इश्यू 26 ऑगस्ट रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी 23 ऑगस्ट रोजी बोली सुरू होईल.