९ रुपयांचा शेअर पोहचला १ हजारांवर; TATA च्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदार मालामाल

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये काही कंपन्यांनी दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले.

यातच TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्या भारतीय बाजारपेठेसह शेअर मार्केटमध्येही आपल्या कामगिरीचा आलेख उत्तम ठेवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

TATA ग्रुपमधील रिटेल क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या Trent कंपनीने कमाल कामगिरी केली असून, १०,७१३ टक्क्यांचा परतावा देत गुंतवणूकदारांना अतिशय मालामाल केले आहे.

Trent ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाली, तेव्हा या कंपनीचा शेअर ९ रुपयांवर होता. १ जानेवारी १९९९ रोजी Trent चा शेअर ९ रुपयांनी लिस्टिंग झाल्यानंतर ११ फेब्रुवारी २०२२ रोजी Trent कंपनीचा शेअर १ हजार ०६७ रुपयांवर पोहोचला आहे.

१० वर्षांपूर्वी म्हणजेच १४ फेब्रुवारी २०१२ रोजी Trent कंपनीचा शेअर एनएसईवर ९४.०४ रुपयांवर होता, तोच आजच्या घडीला १,०६७.३० अंशांवर पोहोचला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने २३ वर्षांपूर्वी Trent कंपनीत १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आज त्याचाच परतावा सुमारे १.०८ कोटी रुपयांपर्यंत मिळाला असता.

तसेच १० वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने Trent कंपनीत १ लाखाची गुंतवणूक केली असेल, तर त्याला आता ११.३४ लाखांचा परतावा मिळू शकला असता. या शेअर्सने २३ वर्षांत ५७,००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

इतकंच नाही तर गेल्या १० वर्षांत या शेअरची किंमत २१०.१५ रूपयांवरून २४३६.५५ रूपयांवर आली आहे. यादरम्यान, या शेअरने गुंतवणूकदारांना १०५९.६ टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिलंय.

१० फेब्रुवारी २०१७ मध्ये म्हणजेच पाच वर्षांपूर्वीही या शेअरची किंमत ४३२ रूपये होती. आजच्या या शेअरची तुलना करता कंपनीनं गुंतवणूकदारांना ४६४.८० टक्क्यांचे रिटर्न दिले आहे.