अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच याचा सर्वाधिक प्रादुर्भाव पारनेर तालुक्यात आढळून आला होता. याच अनुषंगाने पारनेर तालुक्यात वाढत्या करोनाला आळा घालण्यासाठी 31 जुलैपासून ते 10 ऑगस्टपर्यंत 43 गावे लॉकडाऊन पाळण्यात आला.
आजपासून (दि.12) या 43 गावांतील सर्व व्यवहार सुरळीत होणार आहे. पारनेर तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे तेथील 43 गावे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार या गावांमध्ये गेल्या 11 दिवसांत काटेकोरपणे निर्बंधांचे पालन करण्यात आले. 10 ऑगस्टपर्यंत हे प्रतिबंध होते आजपासून हि गावे अनलॉक होणार आहे. मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार निर्बंध या ठिकाणीही लागू राहणार आहेत.
त्यामुळे दुपारी चारपर्यंत दुकाने सुरू असतील पाचनंतर संपूर्ण तालुक्यात जमावबंदी असणार आहे. व्यावसायिकांचे दुकाने सुरू झाले, तरीही पूर्वीच्या नियमाप्रमाणे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
तालुक्यात लेव्हल तीनचे पूर्वीचे निबंध कायम असणार आहेत. करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावेत, असे आवाहन प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी केले आहे.