नवऱ्याकडून शरिरसुख मिळत नाही, तुम्ही पूर्ण करा, असे म्हणत तिने डझनभर लोकांसोबत केले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- महागड्या गाड्यांमध्ये फिरणाऱ्या महिला आणि एकटे चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना गाठून माझा नवरा मला शरिरसुख देत नाही,

अशी बतावणी करून शुकशुकाट असणाऱ्या ठिकाणी नेऊन त्यांना लुटणाऱ्या ४० वर्षीय महिला आणि तिच्या मुलाला कांदिवली पश्चिमेतील चारकोप पोलिसांनी अटक केली आहे.

गीता पटेल आणि तिचा मुलगा पंकज पडेल अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ही घटना समोर आली. चारकोपमध्ये राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला या दोघांनी शिकार बनवले.

शरिरसुख देण्याच्या बहाण्याने सुनसान जागी नेऊन त्यांच्याकडून सोन्याची चैन आणि किंमती साहित्य घेऊन फरार झाले. ज्येष्ठ नागरिकाने याची माहिती चारकोप पोलिसांना दिली. घटनेच्या दिवशी पीडित बँकेत जमा करून आपल्या घरी परतत होता.

तेव्हा आरोपी महिलेने त्यांना एकटे पाहून महिलेने ज्येष्ठाला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याकडून शरिरसुख मिळत नाही,

तुम्ही ते पूर्ण करा, असे म्हणत तिने रिक्षात बसवून ज्येष्ठाला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या साईटवर नेले आणि कपडे उतरवण्याच्या बहाण्याने सोन्याची चैन हिसकावली.

तसेच पैस उकळण्याचाही प्रयत्न केला. पैसे दिले नाही, तर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

दरम्यान, चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक फोर्ड विस्टा कार आढळली आणि आरोपी महिलेचे छायाचित्र विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाठवले.

महिला सराईत गुन्हेगार असून तिने सुमारे डझनभर लोकांची अशी फसवणूक केली आहे. ती मीरा रोड येथील रहिवासी असून तिच्यावर मीरा रोड, नया नगर, बोरिवली, कस्तुरबा, अंधेरी, चारकोप, एमआयडसीसह विविध पोलीस ठाण्यांत १४ गुन्हे दाखल आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24