अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सरकारने लग्न, मेळावे घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील भारतीय जनता पक्षाचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी श्रीरामपूर येथे मेळावा घेऊन कार्यकर्त्यांची गर्दी जमविली.
याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर पोलिसांना दिले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे कि माजीमंत्री व आमदार राधाकृष्ण विखे-पाटील हे शुक्रवारी श्रीरामपूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीसाठी आले होते.
या बैठकीनंतर श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावरील अनमोल रसंतीच्या सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यानंतर सर्वाना स्नेहभोजन देण्यात आले.
या मेळाव्यास कुठलीही परवानगी घेतली नव्हती. या बाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता मनोज पाटील यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.